आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेते सोडून गेल्याने कॉंग्रेसमध्‍ये उमेदवार शोधण्यासाठी झाली दमछाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रवादीला जागा सुटणार म्हणून जिल्ह्यात अनेक नेत्यांनी काँग्रेसमधून इतर पक्षात उड्या घेतल्याने वावटळ उठली होती. नंतर नवे उमेदवार शोधून त्यांना ए-बी फॉर्म देण्यापर्यंत बरीच दमछाक सहन करावी लागली.
ऐन निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेतेमंडळी शिवसेना, भाजपमध्ये गेले. पक्षाला लागलेली ती गळती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच होती. शुक्रवारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदेश सचिव बाळासाहेब शेळके यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री आनंदराव देवकते हे शेळकेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. काँग्रेस माझी आई आहे, असे नेहमी सांगणाऱ्या देवकतेंनी अडचणीच्या काळात जावयाच्या प्रेमापोटी पक्षाची साथ सोडली.