आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये गळती सुरूच, देवकतेंसह माढ्याच्या साठे पिता-पुत्रांची सोडचिठ्ठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभानिवडणुकीचे एकीकडे 'काऊंट डाऊन' सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये माजी मंत्री आनंदराव देवकते, प्रदेश सचिव बाळासाहेब शेळके माढ्याचे माजी आमदार धनाजी साठे त्यांचा मुलगा दादासाहेब साठे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जिल्ह्यातील काही नेत्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केले होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच पुन्हा दोन मोठ्या नेत्यांनी राजीनामे दिले.
माजीमंत्री आनंदराव देवकते यांच्या राजीनाम्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसला जबर हादरा बसणार आहे. दक्षिण तालुक्यात देवकतेंचा स्वतंत्र गट आहे. त्यांनी २५ वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले होते. मागील साडेचार वर्षे आमदार दिलीप माने यांच्यासोबत असणारे देवकते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही मानेंच्या सोबत नव्हते. शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर शनिवारी माजी मंत्री देवकतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत काँग्रेसला रामराम ठोकला. दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यांतील राजकारणात देवकतेंच्या गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
...तर पक्षाच्या अडचणी वाढतील
जिल्हाध्यक्षपाटील यांनी साठेंनी केलेले सर्व आरोप फेटाळूून लावत निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडतातच, असे सांगून स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यास काँग्रेसची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बार्शी, सांगोला, करमाळा तालुक्यांत पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. माळशिरस तालुक्यात काँग्रेसला उमेदवारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करावी लागली. जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेते मंडळींचे मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष झाले आहे.
वारसांसाठी राजीनामे
माजीकेंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांनी मुलगा महेश कोठेंच्या उमेदवारीसाठी पक्षाचा राजीनामा दिला. माजीमंत्री आनंदराव देवकते यांनी जावई बाळासाहेब शेळके यांना आमदार करण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला. माढ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. धनाजी साठे यांनी मुलगा दादासाहेब साठे यास उमेदवारी डावलल्याच्या कारणास्तव पक्षाचा राजीनामा दिला.
साठे देणार तक्रार
माढ्याचेमाजी आमदार अॅड. धनाजी साठे त्यांचा मुलगा माढ्याचे माजी सरपंच दादासाहेब साठे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. दादासाहेब साठे हे माढ्यातून निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. एेनवेळी काँग्रेसने साठेंना एबी फाॅर्म देण्याएेवजी शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या कल्याणराव काळेंना दिला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी उमेदवारीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा घणाघाती आरोप साठे यांनी केला. तसेच, त्यांच्याबरोबर मोबाइलवरून झालेल्या संवादाची स्वतंत्र सीडी तयार करून िनवडणूक आयोगाकडे त्याबाबतची लेखी तक्रार साठेंनी केली.
बार्शी, सांगोला, करमाळा येथे अिस्तत्व दाखवण्याचे आव्हान