आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतीश यांनी तासात उरकला दौरा, पक्षातील बंडखोरीबाबत चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भाजपचेकेंद्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश सोमवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. होटगी रस्त्यावरील किनारा हॉटेलमध्ये निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तासात ते परत फिरले. शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रतिक्रियाही देण्यास नकार िदला.
भाजपाचे नेते व्ही. सतीश यांनी सोमवारी सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांचा विमानाने धावता दौरा केला. सोलापूरचा दौऱ्यातही निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली मात्र, माध्यमांशी बोलणे टाळले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शंकर वाघमारे, अविनाश कोळी, आमदार विजयकुमार देशमुख, मोहिनी पतकी, रामचंद्र जन्नू, विक्रम देशमुख, पांडुरंग दिड्डी, देवा अंजिखाने उपस्थित होते. हॉटेल किनारा येथे आयोजित बैठकीत संघटनमं़त्री व्ही. सतीश यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.