आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेस आमचा प्रमुख विरोधक, राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रवादीकाँग्रेसच्या राक्षसीप्रवृत्तीच्या मागण्यांच्या प्रमुख कारणामुळेच आघाडी तुटली. त्या पक्षाने विश्वासघात करीत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला असल्याने विधासनभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आमचा प्रमुख विरोधक असल्याचे, काँग्रेसचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसभवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी पक्षाच्या निवडणूक तयारीची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही कार्यकर्ते नसल्यामुळे त्या पक्षाचे नेतेच स्वत: निवडणुकीत उभे आहेत. काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. आघाडी तुटल्याचा सर्वांधिक फायदा काँग्रेसला होणार आहे. राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस होईल, हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.
प्रभाग निरीक्षकांची नियुक्ती
शहरकाँग्रेसने महापालिका प्रभाग क्षेत्रातील प्रचाराचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र ५२ निरीक्षकांची नियुक्ती केली. त्या निरीक्षकांच्या समन्वयाचे जबाबदारी स्थानिक नेत्यांकडे विभागून देण्यात आल्याचे, शहर काँग्रेसच्या मिडीया सेलचे प्रमुख अँड. यू. एन. बेरिया यांनी सांगितले. त्या प्रभाग निरीक्षकांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप सोमवारी काँग्रेस भवनमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातीलतिन्ही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असे सांगणाऱ्या र्काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे फक्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. मतदारसंघातील तेलुगू मुस्लिम समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांचे िनयोजन सुरू आहे. त्यामध्ये तेलुगू अभिनेता राम बाबू, अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष अली अजीज, माजी केंद्रीय मंत्री गुलामनबी आझाद, सलमान खुर्शीद यांच्यासह आंध्र प्रदेशातील काही खासदार येणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या जाहीर सभेबाबत अद्याप ठरले नाही. पण, त्यांच्या नावाची मागणी करण्या येईल, असेही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.
कोंठेमुळे होणार फायदा
शहरमध्य मतदारसंघातूनच महेश काठे यांनी निवडणूक लढवल्यास त्याचा सर्वांधिक फायदा काँग्रेसलाच होणार असल्याचे, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी स्पष्ट केले.