आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांनंतर गंगाधरपंत प्रचारात, बोल्ली, सादूल, कमटम, येमूल आले एकाच व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या15 वर्षापासून राजकारणापासून दूर राहिलेले माजी खासदार गंगाधरपंत कुचन आज काँग्रेसच्या प्रचारात उतरले.
त्यांच्यासमवेत पूर्व भागातील सहकार क्षेत्रातील नेते माजी खासदार धर्मण्णा सादूल, सत्यनारायण बोल्ली, भूमय्या येमूल, मल्लिकार्जुन कमटम, जी. एस. आडम, प्रा. पुंजाल ही मंडळी एकाच व्यासपीठावर होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार मेळाव्याच्या निमित्ताने पूर्व भागातील नेते एकत्र येण्याची गेल्या पंधरा, वीस वर्षातील पहिलीच घटना होती. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे काँग्रेसपासून दूर गेल्याने आणि महेश कोठे यांनी काँग्रेसलाच आव्हान दिल्याने पूर्व भागातील मतदानावर या निवडणुकीची बरीच गणिते अवलंबून आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. कुचन हे तर गेल्या १५ वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त होते. मात्र बुधवारी ते काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले सत्यनारायण बोल्ली, धर्मण्णा सादूल यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदे यांच्यासह तीन माजी खासदार आज एका व्यासपीठावर दिसले. सुशीलकुमार शिंदे, पूर्वभागातील माजी खासदार गंगाधरपंत कुचन, सत्यनारायण बोल्ली, धर्माण्णा सादूल यांच्यासह पूर्व भागातील अनेक नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या विजयासाठी झाली एकजूट
प्रणिती शिंदे यांच्या कामाचा धडाका अनुभवला आहे. सहकारातील अनेक प्रश्न त्यांनी सरकारमधून मंजूर करून आणले आहेत. अनेक योजनांसाठी त्यांचा पाठपुरावा राहिला आहे. सत्यनारायणबोल्ली, सहकारनेते पूर्व भागातील तिन्ही दिग्गज नेते एकत्र आले ही आनंदाची बाब आहे. ज्या ज्यावेळी मी येथून निवडून आलो, तेव्हा विकासाचे अनेक प्रकल्प मंजूर करून आणले. या नेत्यांचे एकत्रित येणे ही प्रेरणा देणारी घटना आहे. सुशीलकुमारशिंदे, माजीगृहमंत्री
प्रणिती शिंदे यांचे कार्य लोकाभिमुख आहे. विरोधी उमेदवारांची अनामत जप्त केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. काँग्रेसचा विजय ही काळ्या दगडावरची रेष आहे. गंगाधरपंतकुचन, माजीखासदार