आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा मतदारसंघांमध्ये लागणार मतदान यंत्रांची गरज, मोहोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातीलसहा विधानसभा मतदारसंघामध्ये १५ पेक्षा अधिक उमेदवार राहिल्याने दोन मतदान यंत्रे द्यावी लागणार आहेत. महायुती तुटल्याने आघाडीत बिघाडी झाल्याने उमेदवारांची संख्या वाढली. शिवाय त्यामध्ये मनसे, बसप या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांमुळे उमेदवार संख्या १६ च्या वर गेली आहे.
मोहोळ, उत्तर सोलापूर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, पंढरपूर माळशिरस या सहा मतदारसंघांमध्ये त्यामुळे दोन मतदान यंत्रे द्यावी लागणार आहेत. मोहोळ मतदारसंघामध्ये १६ उमेदवार राहिल्याने दुसऱ्या मतदान यंत्रावर फक्त नोटा हे बटन असणार आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक ३०, त्या खालोखाल शहर मध्यमध्ये २६ उमेदवार आहेत. करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट सांगोला या पाच मतदारसंघामध्ये एकच मतदान यंत्र लागणार आहे. मतदार नोंदणी विशेष मोहिमेत जिल्ह्यातून ३६ हजार ६२० अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये हजार ४८९ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ३२ लाख ५८१ मतदार...
सोलापूरजिल्ह्यातील मतदारसंख्येत पुन्हा ३१ हजार १३१ मतदारांची भर पडली आहे. विशेष मोहिमेनंतर मतदारांची एकूण संख्या ३२ लाख ५८१ वर पोहोचली आहे. यामध्ये पुरूष मतदार २३ लाख १२ हजार ८४६ तर महिला मतदार २१ लाख ५५ हजार ४३५ इतकी आहे. इतर मतदारांची संख्या ३४ आहे.