आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळच्या विकासात पाटील-डोंगरे यांचे योगदान मोठे: कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ- तालुक्याचाविकास करण्यासाठी मी उभा आहे. राजन पाटील, मनोहर डोंगरे ही राम-लक्ष्मणाची जोडी आहे. अहोरात्र विकासासाठी ती झटत आहे. मी जास्तीत जास्त निधी आणून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जनतेने मोठ्या मतांनी विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम यांनी केले.
तालुक्यातील कुरूल येथे प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, सभापती जालिंदर लांडे, प्रकाश चवरे, मानाजी माने, सभापती अंबिका पाटील, तात्या खंदारे आदींसह अनेक उपस्थित होते.
कदम म्हणाले, ‘गेल्या २४ वर्षांत मोहोळ तालुक्याचा विकास झालेला दिसत नाही. तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीने माझी उमेदवारी दिली आहे.’ रमेश कदम यांच्या प्रचाराचा अत्याधुनिक रथ लक्ष वेधून घेत होता.
गद्दारांना जागा दाखवून द्या- आमदारलक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक पदे उपभोगली. गेली ४० वर्षे ते सत्तेत आहेत. असे असताना पक्षाचा आदेश मानता पक्षाशी गद्दारी केली. मोहोळ मतदार संघ हा विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी येत्या काळात मतदारांनी राष्ट्रवादीच्याच मागे उभे राहावे, असे आवाहन कदम यांनी केले.