आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची उद्या सभा, सेना, भाजप की काँग्रेसवर कोणती तोफ डागणार याकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पश्चिममहाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने व्यूहरचना आखली आहे. कोल्हापूर, सांगली, विदर्भानंतर आता रविवारऑक्टोबर रोजी पवार यांची सभा सोलापुरात होणार आहे. पवार कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्या सभेमुळे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना किती बळ देणार? हे प्रत्यक्ष सभा निकालानंतरच कळेल. 15 वर्षांच्या दोस्तीनंतर अखेर काँग्रेस राष्ट्रवादी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पहिल्या टप्प्यात पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची रविवारी सायंकाळी वाजता अक्कलकोट रस्त्यावरील पुंजाल मैदानावर सभा होत आहे. यापूर्वी पवार यांनी सोलापुरात वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत सभा घेतली होती. पवारांनी या सभेत थेट काँग्रेसचे प्रमुख नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच तोफ डागली होती. शहराचा विकास ज्याप्रमाणात व्हायला पाहिजे, त्याप्रमाणात झाले नसल्याचे सांगण्यासही ते विसरले नव्हते. रविवारी शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर अक्कलकोट या मतदारसंघातील उमेदवारांसाठी ही सभा असणार आहे. महापालिकेचा कारभार आजही दोन्ही पक्षांच्या सहयोगावर सुरू असल्याने या सभेत ते काय बोलणार, कोणाला लक्ष्य करणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
कुणावर बरसणार
शहरातीलशहर मध्य, शहर उत्तर दक्षिण सोलापूर मधील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकेकाळी पालकमंत्री राहिलेले पवार यांना शहरासह जिल्ह्यातील सर्वच घडामोडींचा अभ्यास आहे. यामुळे पवार हे रविवारच्या सभेत कोणावर टीकास्त्र उगारणार? याकडे लक्ष आहे. शहरातील इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता ही सभा उमेदवारांना बळ देणारी ठरणार आहे.
दुस-या टप्प्यात अजित पवार, आर. आर. पाटील
प्रचाराचीरणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात रविवारी शरद पवार यांची सभा होत आहे. दुस-या टप्प्यात अजित पवार, आर. आर.पाटील, सुनील तटकरे यांच्या सभा होणार आहेत. काही सभा या शहरात तर काही सभा ग्रामीण भागामध्ये होणार आहेत.