आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण मतदारांच्या हाती आता उमेदवारांचे भवितव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यात११ विधानसभा मतदार संघातील मतदारांची अंतिम यादी करण्यात आली आहे. ३२ लाख हजार ५२९ मतदार संख्या असून यामध्ये पुरुष १६ लाख ८६ हजार ४४३ तर महिला मतदारांची संख्या १५ लाख १४ हजार १०४ इतकी आहे. इतर मतदारांची संख्या ३४ आहे. मतदार यादीतील मतदारांचा विचार करता लाख ३७ हजार ९११ तरुण मतदारांची संख्या असून या मतदारांच्याच हाती उमेदवारांचे भविष्य आहे.
निवडणूक कार्यालयांकडून वयोमानानुसार उमेदवारांची यादी तयार केली आहे. यामध्ये ३० ते ३९ या वयोगटातील लाख ४५ हजार ९७४ मतदार आहेत तर १८ वय पूर्ण केलेले प्रथमच मतदान करणारे २३ हजार १५९ मतदार आहेत. सत्तरी ओलांडलेले लाख ८८ हजार ४४५ तर ८० वर्षे पूर्ण झालेले लाख हजार १२४ मतदारांचा समावेश आहे. मतदानादिवशी यातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असेल.
तरुण मतदारांवर जाहिरातींचा मारा
राजकीयपक्षाच्या उमेदवारांकडून तरुण मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेऊन जाहिरातबाजी, जाहीरनामा आश्वासने दिली जात आहेत. त्यानुसारच अनेक उमेदवार मतदारांना विशेषत: तरुणांना जाहिरातीच्या माध्यमातून जवळ घेण्याच्या प्रयत्न करत असल्याचे दिसते. याच युवा मतदाराला आत्कृष्ट करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाचा असतो.