आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळावर निवडणुकीचा धुराळा, विमानतळावर झाले दहा लँडिंग आणि टेकऑफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विमानतळ गुरुवारी फारच बिझी असल्याचे दिसून आले. विमान आणि हेलिकॉप्टर यांची एकूण दहा वेळा उतरणे आणि दहा वेळा उड्डाणे झाली. सोलापुरात गुरुवारी प्रमुख नेत्यांची दौरे असल्याने सकाळपासून सोलापूर विमानतळावर विमानांचे येणे जाणे होत होते. त्यात अतिमहत्त्वाची व्यक्ती असल्याने गुरुवारी सोलापूर विमानतळाला पोलिसांचा बंदोबस्त होता.
रामदास कदम यांना सोलापुरातून घेऊन जाण्यासाठी नागपूरहून विशेष विमान सोलापूरला सकाळी साडेदहा आले. साडेसहाच्या सुमारास कदम यांना घेऊन विमान अमरावतीकडे झेपावले. त्यानंतर 11 वाजून 15 मिनिटांनी सुशीलकुमार शिंदे यांना घेण्यासाठी औरंगाबादेतून विमान सोलापूरला आले. साडेअकराच्या सुमारास शिंदे यांना घेऊन विमान बेळगावला रवाना झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलही होते.
दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीहून विमानाने आले. पाचच मिनिटात ते हेलिकॉप्टरने मंद्रूपकडे रवाना झाले. सिंहांसाठीचे हेलिकॉप्टर साता-याहून सोलापूरला आले आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजनाथ सिंह हे सोलापूरहून मुंबईला रवाना झाले.बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे पुण्याहून दुपारी वाजून 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरने आगमन झाले. विशेष म्हणजे, ते निळ्या रंगाच्या हेलिकॉप्टरनेच आल्या आणि गेल्या. दुपारी चारला त्या पुण्याला रवाना झाल्या.