मंगळवेढा- भीमानदी ऐन हिवाळ्यात कोरडी पडली आहे. शहरासह नदी काठावरील ११ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
भीमा नदी कोरडी पडल्यामुळे ब्रह्मपुरी, माचणूर, बठाण, उचेठाण तामदर्डी, राहाटेवाडी, मुंढेवाडी, अर्धनारी, घोडेश्वर, बोराळे, अरळी, सिध्दापूर, तांडोर, नंदूर आदी गावांच्या नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या नदीचे पात्र कोरडे आहे. त्यामुळे नळपाणीपुरवठा योजना विहीरीत क्षारयुक्त पाणी येत आहे. तरीही लोकांना ते पाणी प्यावे लागत आहे.
४८ तासांत सोडणार
-भीमानदीतील सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत. भीमा नदीत येत्या ४८ तासांत पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. शेतीसाठी फेब्रुवारी दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाऊ शकते.” भगवानचौगुले, पाटबंधारे अधिकारी
मंगळवेढा तालुक्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीवरील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.