आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमी मुक्ती: रिपाइं आठवले गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भूमिहीनांना शासनाने पाच एक जमीन द्यावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, विशेष घटक योजनेच्या लाभािर्थंना तीन लाख रुपये द्यावेत, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बुधवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमी मुक्ती मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले उपस्थित होते. तर प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
अनुसूचित जातीच्या दाखल्यासाठी लागणारी ५० वर्षांची पुराव्याची जाचक अट रद्द करावी, अनुसूचित जाती-जमातीच्या महा मंडळांना वाढीव आर्थिक तरतूद करावी, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नावे द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर बालेकिल्ला : रामदास आठवले
सोलापूरजिल्हा हा आमचा बालेकिल्ला आहे. म्हणून राजा सरवदेना सल्ला अशी सुरुवात केली. भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून भूमिहीनांना जमीन मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक मोठ्या लोकांकडे जमीन भरपूर आहेत, त्यामुळे कायद्यानुसार केलेल्या जमिनीचे अतिक्रमण ही काढून घेऊ असेही ते म्हणाले.