आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’चे शटर बंदच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील बहुतांश बँकांच्या ‘एटीएम’ यंत्रणा पैशाअभावी रविवारीही बंदच होत्या. रिझर्व्ह बँकेने सूचना देऊनही बहुतांश बँकांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारी पाडव्याची सुटी आहे. त्यामुळे मंगळवारीच (ता. 5) एटीएम केंद्रे सुरू होतील.

बँकांना एकापेक्षा अधिक सुट्या आल्या तर एटीएमच्या पैशाचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. ग्राहकांची अडचण होता कामा नये, अशा सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्या आहेत. त्यानुसार फक्त स्टेट बँकेने पैशाचे नियोजन केले. रविवारी बाळीवेस शाखेत निवडक अधिकारी, कर्मचार्‍यांना बोलावून एटीएम केंद्रे सक्षम करण्याचे उपाय केले गेले. त्यामुळे शहरातील एसबीआयची केंद्रे सुरू होती. जुळे सोलापुरातील केंद्र मात्र बंदच होते. इतर एटीएम बंद असल्याने साहजिकच एसबीआय केंद्रांसमोर ग्राहकांच्या रांगा होत्या.

27 कोटींची रक्कम काढली
60 शहरात एकूण एटीएम केंद्रे
15 लाख एका एटीएममध्ये रोजची उपलब्धता
27 कोटी गेल्या तीन दिवसांत निघालेली रक्कम