आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना हीरो करण्यासाठी ‘एटीएस’ची बनावट कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नरेंद्र मोदी यांना हीरो करण्यासाठी पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील ‘एटीएस’ने सोलापुरात बनावट कारवाईत युवकांना गोवले आहे, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य, माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. या प्रकरणाची ‘सीबीआय’तर्फे स्वतंत्र चौकशी आणि युवकांच्या सुटकेच्या मागणीसाठी पंतप्रधानांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंदूर ‘एटीएस’ने 24 डिसेंबरला सोलापुरातून दोघांना सिमीचे असल्याच्या संशयावरून अटक केली. हे दोन्ही युवक निदरेष असल्याचा दावाही त्यांनी केला. आडम म्हणाले, की उमेद दंडोतीच्या घरातून शस्त्र सापडल्याचे ‘एटीएस’ने दाखवले. प्रत्यक्षात ते तेथे गेलेच नव्हते. खालीद मुच्छाले आणि सादिक लुंजे यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी स्फोटके सापडली नव्हती. मग, ती आली कोठून? याबाबत ‘एफआयआर’मध्ये नोंद नाही.