आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atul Parchure News In Marathi, Solapur, Marathi Film

परचुरे यांनी घडवली दोन तासांत परदेशवारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महाराष्ट्रीयन जोडप्यांचा पहिला परदेश दौरा. तेथे त्यांचे भांडण, गंमतजंमत, धांदरटपणा, त्यातून होणारी मस्करी आदी अनेक किस्से सांगत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अतुल परचुरे यांनी दोन तासांत उपस्थितांना आपल्या अनुभवातून अक्षरश: परदेशवारी घडवून आणली. ‘दिव्य मराठी’ आणि ‘कॉक्स अँण्ड किंग्ज’ च्या वतीने रविवारी रात्री सात वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे ‘भटकंती जगाची गंमत ट्रॅव्हलकरांची’ हा एकपात्री कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला सोलापूरकरांनी भरभरून दाद दिली.


दोन तासांच्या कार्यक्रमात परचुरे यांनी दुबई, अमेरिका, रशिया, इंग्लंड, सिंगापूर आदी देशांतील प्रवास आपल्या विनोदी शैलीतून सादर केला. प्रवासादरम्यान आलेले अनुभव आणि विनोदी किश्श्यांनी उपस्थितांचे मनोरंजन झाले. त्यांच्या प्रत्येक किश्श्याला उपस्थितांमधून भरभरून दाद मिळत होती.


प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड टिंकेश ग्यामलानी, वितरण विभागप्रमुख संजय जोगीपेठकर, जनता बँकेचे जगदीश तुळजापूरकर, प्रियदर्शन शहा, सुधीर बसवंती, नितीन बुर्‍हाणपुरे, शाल्मली चिडगुपकर यांची उपस्थिती होती. मंजूषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.


काकांच्या ‘आयू लव्ह यू’ला काकूंचा आशीर्वाद
इंग्लंड दौर्‍यावर काका आणि काकू गेलेले असतात. काकांच्या चिडचिड्या स्वभावामुळे काकू परदेशवारीचा आनंद उपभोगत नव्हत्या. त्यामुळे सहप्रवाशांनी काकांची समजूत काढली आणि काकांनी काकूला अभिनेत्याप्रमाणे एका पायावर बसून गुलाब पुष्प देत आय लव्ह यू म्हटलं. काकूंसाठी हा अनुभव पहिलाच असल्यामुळे त्या गोंधळल्या. आणि त्यांनी काका खाली वाकताच त्यांना आशीर्वाद दिला. हा अनुभव परचुरे यांनी आपल्या शैलीत सादर करताच उपस्थितांतून हशा पिकला.


‘दिव्य मराठी’तर्फे सत्कार
‘दिव्य मराठी’च्या वतीने आठवड्यातून एकदा पाककला संदर्भात वाचकांकडून रेसीपी मागवून ती प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार ज्यांची रेसीपी प्रसिद्ध झाली त्यापैकी डॉ. सरोज बोलदे तसेच रेखा शहा (सासू), साजिरी शहा (सून) या सासू-सुनांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.