आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..अखेर सोलापुरात रोड स्वीपर सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील सफाईसाठी आणलेले आणि गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले दोन रोड स्वीपर पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर मंगळवारी सुरू करण्यात आल्याची माहिती सफाई अधीक्षक एम. के. तलवार यांनी दिली.
मंगळवारी या स्वीपरने जुना एम्प्लॉयमेंट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत असलेल्या रस्त्यावरील धूळ साफ करण्यात आली. 13 व्या वित्त आयोगातून एक कोटी 20 लाख रुपये खर्च करून घेण्यात आलेले दोन रोड स्वीपर तांत्रिक कारणामुळे बंद होते. त्यामुळे शहरातील व्हीआयपी रस्त्यावर धूळ साचत होती. रोड स्वीपरबाबत ओरड होत असल्याने साहाय्यक आयुक्त अनिल विपत, सफाई अधीक्षक आर. एम. तलवार यांनी लक्ष घालून दोन्ही रोड स्वीपर सुरू केले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी एक रोड स्वीपर डफरीन चौक ते महापालिका दरम्यान काम करीत असताना पाण्याचे पाइप फुटल्याने पुन्हा बंद पडला.