आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडेवारांसाठी धावले रिक्षाचालक; रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या सर्मथनार्थ बुधवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत सोलापुरातील लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रिक्षा बंदची हाक दिली होती. त्याचा परिणाम दुपारपर्यंत जाणवला. नंतर मात्र रिक्षा पुन्हा धावू लागल्या. रिक्षा बंदला संमिर्श प्रतिसाद मिळाल्याचे लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे सचिव सलीम मुल्ला यांनी सांगितले.

रेल्वे स्थानक व एसटी स्टॅन्डच्या परिसरात संपाचा सर्वाधिक फटका बसला. परगावाहून आलेल्या प्रवाशांना आपले घर गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात लाल बावटा संघटनेचे किमान 200 तर बसस्थानक परिसरात 500 रिक्षा चालक आहेत. या सर्व रिक्षाचालक संपात सहभागी झाल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागली. अन्य रिक्षा संघटनेच्या रिक्षा मात्र सुरळीतपणे धवत होत्या.

सोलापूरचे कर्तव्यदक्ष अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना सर्मथन देण्यासाठी आम्ही आज एक दिवस रिक्षा बंद ठेवली आहे. गुडेवारांसारखा प्रामाणिक अधिकारी सोलापुरातून जाऊ नये, हीच आमची भावना आहे. चंद्रकांत गायकवाड, अध्यक्ष , रेल्वे स्थानक रिक्षा संघटना