आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Award News In Marathi, Gurbal Tawase Achieve National Award, Divya Marathi

गुरुबाळ तावसे यांना राष्ट्रीय पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरातील लोकसेवा हायस्कूलमधील गणित विषयाचे शिक्षक गुरुबाळ तावसे यांना मुंबई येथील राष्ट्रीय मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्राइड ऑफ गुणिजन परिवार अवॉर्डस्चा हा पुरस्कार समारंभ 31 मे रोजी हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर थायलंड येथे गुणिजन दौरा असून मुंबई येथे ग्लोबल गुणिजनांचे परिषद होणार आहे. तावसे यांना आलीकडेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून त्याअगोदर त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमंगल प्रतिष्ठानकडून शिक्षकरत्न, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषदेचा पुणे विभागीय पुरस्कार, भीम प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार, बसवरत्न व सिध्दसंघ प्रतिष्ठानकडून पुरस्कार मिळाले आहेत. पाठय़पुस्तक समीक्षक मंडळात ते समीक्षक आहेत.