आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी. एड. आता झाले दोन वर्षांचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पदवीनंतर एक वर्षे कालावधीचा बी. एड. अभ्यासक्रम या वर्षापासून दोन वर्षांचा होत आहे. या निर्णयानंतर एकेकाळच्या विद्यार्थीप्रिय अभ्यासक्रमाची सद्यस्थिती खूपच बिकट होत असल्याचे निदर्शनास येत अाहे. एम. ए. एम.एड., टीईटी उत्तीर्ण, सेट नेट किंवा पीएच. डी. अशी शिक्षकांची पात्रता प्राप्त करावयाची असेल तर २८ वय पार करावे लागेल. त्यानंतर करिअर सुरू होईल. इतकी वर्षे तर डॉक्टरकी होण्याकरता लागत नाहीत.
एकेकाळी डी. एड., बी. एड. अभ्यासक्रम करणे प्रतिष्ठेचे होते. डी. एड.ला नंबर लागला तरी मुलींचे विवाह "हुंड्याविना' जुळून येत असे. गुरुजी, शिक्षक बनण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची स्पर्धा असायची. डोनेशन देऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जायचा. अभ्यासक्रमाच्या या सुवर्णयुगाला उतरती कळा लागली ती विनाअनुदान तत्त्वामुळे. विद्यार्थ्यांकडून फी सोडून आणखी वर डोनेशन मिळते असे म्हटल्यानंतर या अभ्यासक्रमाचे विनाअनुदानित महाविद्यालय सुरू करणाऱ्यांना मान्यता देण्याचा सपाटा सुरू झाला.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा भाग म्हणून अभ्यासक्रम दोन वर्षाचा करण्यात आला आहे. या दोन वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमातील दर्जा उंचावत, परिपूर्ण शिक्षक घडावेत असा प्रयत्न नव्या अभ्यासक्रमाद्वारे करण्यात आला आहे.''
प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर, डीबीपी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन
अभ्यासक्रमातील नव्या बदलामुळे गुणवत्ता वाढेल
दरवर्षी मार्चमध्ये बी. एड. प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यंदा जून उजाडला तरी कोणतीही हालचाल िदसून येत नाही. बी.एड. केले तरी नोकरीची शाश्वती नाही. खासगी संस्थांमध्ये दहा ते पंधरा लाख रुपये डोनेशन. इतके करूनही पगार नाही. इतका दुर्लक्षित अभ्यासक्रम बनल्याची खंत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. मात्र, विनाअनुदानित धोरण बंद झाल्याशिवाय शिक्षकी पेशाकडे गुणवंत विद्यार्थी वळणार नाहीत, हेही स्पष्ट आहे. एका अर्थाने इतका संवेदनशील विषय असूनही यावर कोणतीही चर्चा, प्रतिक्रिया समाजात घडताना दिसून येत नाही, हे अस्वस्थ करणारे चित्र असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

जुन्या अभ्यासक्रमात आठ ते नऊ महिन्यांच्या जेमतेम कालावधीत गुणवत्ताप्रधान शिक्षक घडवणे हीच जणू परीक्षा होती. पण दोन वर्षे कालावधीमुळे दर्जेदार अभ्यासक्रमाच्या आधारे शिक्षक घडवला जाईल. अभ्यासक्रमाच्या तीन पायऱ्या आणि नंतर २० आठवड्यांची इंटर्नशिप असणार आहे. इपीसी द्वारे कला, संगीत, नाट्य, साहित्य अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. शिक्षकांना घडवणारा परिपूर्ण अभ्यासक्रम बनवण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठांना देण्यात आले आहे, असे प्राचार्य डॉ. क्षीरसागर म्हणाले.
पूर्वी हा अभ्यासक्रम केवळ अनुदानित महाविद्यालयात असे. राज्यात तेव्हा फक्त ६७ शिक्षणशास्त्र महाविद्यालये होती. गत काही वर्षात विनाअनुदानित बी.एड. महाविद्यालये काढण्यात आली. आज ३०० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. यातील काही विद्यार्थी संख्येअभावी सुरूही होत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...