आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबाराव सावरकरांचे स्मारक सांगलीत पेटवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या येथील कृष्णा नदीकाठच्या स्मारकाला मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी आग लावली. यात सावरकरांची दुर्मिळ छायात्रिचे, दुर्मिळ ग्रंथ व इतर साहित्य खाक झाले.

सांगलीत कृष्णाकाठी 60 वर्षांपूर्वी बाबाराव सावरकरांचे स्मारक बांधण्यात आले. याच जागेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मारकाच्या इमारतीत एक सभागृह आणि ग्रंथालय आहे. यात अनेक दुर्मिळ ग्रंथांसह दीड हजारांवर पुस्तके आहेत. स्मारकाच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रोज संचलन होते.

स्मारकाच्या देखरेखीसाठी रखवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तो सुटीवर गेल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तींनी स्मारक पेटवून दिले. या घटनेचा सावरकर विश्वस्त समिती, हिंदुत्ववादी संघटना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.