आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babies hattura To Hattura boramani Fly Ovhar Issue At Nagar

बाळे-हत्तूर ते हत्तूर-बोरामणी बायपास अन् उड्डाणपूल करा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री देशमुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातून जाणाऱ्या महामार्गांना बाह्यमार्ग देऊन जडवाहनांना पर्यायी मार्ग करून देण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. शहराबाहेरून जाणाऱ्या बाळे ते हत्तूर आणि हत्तूर ते बोरामणी या प्रस्तावित मार्गाला निधी मिळवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाण्याची तयारी दर्शवली. प्रस्तावित बाह्यमार्गावर उड्डाणपूल बांधण्याबाबतही या वेळी चर्चा झाली. त्यासाठी दिल्लीत बैठक घेण्याचेही ठरले.

मंत्रालयातील देशमुख यांच्या कक्षात याबाबत बैठक झाली. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक रामचंदानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एस. एस. सोळंकी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक इखे, नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी सु. ज्ञा. रेडेकर, सोलापूर महापालिकेचे उपअभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख यांनी गेल्याच महिन्यात सोलापूरच्या रस्त्यांसंबंधी बैठक घेतली होती. त्यानंतर या फेरआढाव्यात निर्णायक टप्प्यावर कामांची सूचना केली. त्यामुळे शहराच्या बाह्यवळणाचे काम लवकरच सुरू होईल.

रेल्वे भुयारी मार्ग
भुयारी मार्ग बाह्यवळणावर
उड्डाणपूल बाह्यवळणावर
कामे एकात्मिक रस्त्याची
फाइल करा गतिमान

एकात्मिकरस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे गेल्या सात वर्षांपासून रखडली आहेत. सोलापूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या निर्मितीसाठी त्याचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प निर्माण केला जाणार असून सोलापूर महापालिकेच्या भूखंड विकासातून तसेच इतर काही माध्यमांतून निधी उपलब्ध होईल. मंत्रालयातील संबंधित विभागांची, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा विकास समितीची मंजुरी आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची फाइल तातडीने गतिमान करावी, असे निर्देश विजयकुमार देशमुख यांनी दिले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी कशी होते, पाठपुरावा कसा घेतला जाईल यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. देशमुख यांच्या बैठकीने आशा निर्माण झाली आहे.

निधी उपलब्धतेसाठी लवकरच बैठक घेऊ
जडवाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. रस्त्यांच्या खालील जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. आणि अपघातही होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी बाह्यवळणाचे काम त्वरित घ्यावे लागेल. त्यासाठी पुणे महामार्ग आणि विजापूर महामार्ग जोडणाऱ्या बाळे ते हत्तूर आणि हत्तूर ते बोरामणी या महामार्गांचे काम हाती घ्यावे लागेल. त्याने हैदराबाद महामार्गही जोडला जाईल. या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूलही हवेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याचा आराखडा तयार केला. फक्त निधी उपलब्ध होणे आवश्यक असून आहे. तो प्रश्न श्री. गडकरी यांना घेऊन दिल्लीतच सोडवू, असेही श्री. देशमुख बैठकीत म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शहरातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गांचे प्रस्तावित बाह्यवळणाचा आराखडा तयार केला आहे. भूमिसंपादनाची अिधसूचनाही काढली होती. परंतु ते रखडले. निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामाला गती येईल, अशी उत्तरे अिधकाऱ्यांनी बैठकीत दिली.

धूळ, प्रदूषण करा कमी
शहरातीलरस्त्यांची अवस्था सुधारणे, प्रदूषण आणि धूळ कमी करण्याच्या दृष्टीने उपाय करणे यावरही या वेळी विस्तृत चर्चा झाली. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी मांडले. या संदर्भात मंत्रालयीन विभागांच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या आवश्यक मंजुऱ्या घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले.