आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड: विजेअभावी बॉइस प्रसूतीगृहात टॉर्चवर केल्या दोन शस्त्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेच्या बॉइस प्रसूतीगृहाची बत्ती गेल्या आठवडाभरापासून गुल आहे. मंगळवारी दोन शस्त्रक्रिया चक्क टॉर्चवर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. स्थितीची माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी बुधवारी हॉस्पिटलकडे धाव घेतल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली आणि वीजपुरवठा बहाल करण्यात आला.

साखरपेठेत महापालिकेचे बाॅइस प्रसूतीगृह आहे. शहरात मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात हॉस्पिटलचा वीजपुरवठा खंडित झाला. सौरऊर्जेची पर्यायी यंत्रणा होती. तीही बंद पडली. याविषयी हॉस्पिटलच्या प्रमुखांनी महापालिकेच्या वीज विभागाकडे लेखी तक्रार दिली. मात्र, हॉस्पिटलसारख्या जीवनावश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणच्या तक्रारीची दखल वीज विभागाने गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून वीज आणि सोलर दोघांचाही लपंडाव सुरू होता, तर गेल्या तीन दिवसांपासून दोन्हीही बंद झाल्यामुळे रुग्ण, नातेवाइक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे हाल झाले. याबाबत वरिष्ठांना सांगून कोणीही लक्ष दिले नाही. वैतागून एका समाजसेवकाने पत्रकारांना सांगितले. पत्रकार हाॅस्पिटलमध्ये येताच हालचाली सुरू झाल्या आणि विजेची आणि सौर यंत्रणेची दुरुस्ती झाली.
मंगळवारी टॉर्च लावून केली शस्त्रक्रिया
मंगळवारी १२ मे रोजी दोन फॅमिली प्लॅनिंगच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वीज नसल्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील लाइट, फॅन आणि ओटू मशीन पूर्णपणे बंद होते. काय करावे हे कर्मचाऱ्यांना समजत नव्हते. मेटर्न, परिचारिका, महिला कर्मचारी यांनी मिळून टॉर्च लावून ही शस्त्रक्रिया केली. तसेच, गेल्या आठ दिवसांत प्रसूती करण्यात आल्या. यावेळी कधी लाइट असायची तर कधी नसायची. त्यामुळे विनालाइटच वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. यात काही गडबड झाली असती तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकले असते.
अशी केली तक्रार
मे रोजी झालेल्या वादळावेळी प्रसूतीगृहात लहानसा स्पार्क झाला आणि विद्युतपुरवठा खंडित झाला. याबाबत प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने महापालिकेच्या विद्युत विभागात लेखी तक्रार करण्यात आली. विद्युतपुरवठा खंडित झाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यासाठी विद्युतपुरवठा पूर्ववत करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली. परंतु या पत्राची कोणीही दखल घेतली नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अशा स्थितीबाबत कुणाचे काय म्हणणे आहे...
बातम्या आणखी आहेत...