आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bagalkot Solapur Passenger Accident, Lateat News

तडवळजवळ अपघात, जीवितहानी नाही,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बागलकोट-सोलापूर पॅसेंजर रेल्वेने तडवळ रेल्वे स्थानकाजवळ वाळूने भरलेल्या डंपरला बुधवारी उडवले. त्यात रेल्वे इंजिनचे, डब्यांचे नुकसान झाले. धडक बसताच झालेल्या आवाजामुळे रेल्वे चालकाने आपत्कालीन ब्रेक लावून मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर डंपर चालक आणि क्लिनरने धूम ठोकली.
बागलकोटहून निघालेली गाडी (क्रमांक 57642) तडवळ रेल्वे स्थानक सोडून काही अंतरावरील गेट क्रमांक 120 जवळ आली. त्याचवेळी रुळ ओलांडून पुढे जाण्याच्या बेतात असलेला वाळूने भरलेल्या डंपरला (एमएच 13-4440) भरधाव रेल्वेने उडवले. डंपरचा जागीच चक्काचूर झाला. रेल्वेच्या सात डब्यांचे नुकसान झाले. पहिल्या तीन डब्यांना जास्त झळ पोहोचली. बाकीच्या डब्यांच्या पायर्‍या तुटल्या.
डंपरच्या चालक-वाहकाने वेळीच उड्या घेऊन प्राण वाचवले. धडकेनंतर झालेला आवाज ऐकून रेल्वे चालकाने आपत्कालीन ब्रेक लावले. अपघातामुळे गाडीला उशीर झाला. ती सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी येण्याऐवजी 11 वाजून 20 मिनिटांनी आली.