आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरीच्या बागवान यांची डिझाइन द्व‍ितीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - केंद्रसरकारच्या माय गव्हर्न्मेंट या वेबपोर्टलद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या ई-ग्रीटिंग डिझाइन स्पर्धेत मूळचे पांगरी येथील इम्रान बागवान (हल्ली कोंढवा, पुणे) यांच्या डिझाइनला दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना साडेसात हजारांचे बक्षीस दिले जाईल. याची माय गव्हर्न्मेंट वेबपोर्टलवर अधिकृत घोषणा झाली. जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे.

या स्पर्धेत देशभरातून ६२५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १८ स्पर्धकांद्वारे निर्मित डिझाइनची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली होती. हे १८ डिझाइन्स वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जे डिझाइन जास्तीत जास्त फॉरवर्ड होईल, त्यांची बक्षिसांसाठी निवड करण्यात येणार होती. यात तिरुअनंतपुरम (केरळ) येथील निर्भय सिंग यांनी पहिला तर इम्रान बागवान यांनी दुसरा क्रमांक पटकावला. तामिळनाडूतील कार्तिक जे. यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

बागवान हे सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात निमेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना निमेशनसह लोगो डिझाइन, जाहिरात डिझाइन आदी क्षेत्रांमध्येही विशेष आवड आहे. सध्या ते थंबनेल इन्स्टिट्यूट ऑफ निमेशन आर्ट या संस्थेत कार्यरत आहेत.

चांगले काम करण्याची स्फूर्ती
या निवडीतून मला प्रेरणा मिळाली आहे. तसेच कला क्षेत्रात पुढील काळातही अधिक जोमाने आणि अधिक चांगले काम करण्याच्या दृष्टीने स्फूर्ती मिळाली आहे.'' इम्रानबागवान, डिझाइनर