आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बसप’च्या झेंड्याखाली येऊन ओबीसी समाजाने सरकार स्थापावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - इतर मागास समाजाने (ओबीसी) वेळीच जागृत होऊन दलितांच्या सोबत व बहुजन समाज पक्षाच्या झेंड्याखाली येत आपले सरकार स्थापन करावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी शुक्रवारी येथे केले.

शिवछत्रपती रंगभवन येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष अँड. संजीव सदाफुले, प्रदेश सचिव सुरेश तुरबे आदी उपस्थित होते.

गरुड म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या संघर्षामुळे बहुजन समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळाले. पण जे बहुजनांचे अधिकार हक्क डावलतात, अशा लोकांच्या हाती राज्याची व देशाची सूत्रे आहेत. त्यामुळे बहुजनांच्या प्रo्नी काँग्रेसप्रणीत सरकार बहुजन समीजाला न्याय देत नाही. आजही ओबीसीच्या आरक्षणाचा प्रo्न सुटत नाही. 1984 मध्ये बसपचे संस्थापक काशीराम यांनी ओबीसीच्या हक्कांप्रती देशभर जनजागृती केली. त्यामुळे मंडल आयोगाची अंमलबजावणी काँग्रेसप्रणीत सरकारला भाग पडले.

मिलिंद बनसोडे, उपगुप्त चौधरी, शिवदास तागतोडे, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.