आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्रामप्पा पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अक्कलकोटचे आमदार तथा स्वामी सर्मथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुंदर बलदोटा यांनी मंजूर केला. पोलिसांना तपासकामात मदत करावी, पंधरा दिवसांतून एकदा असे दोन महिने पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, अशी अट घालण्यात आली. 75 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

8 फेब्रुवारी रोजी कारखान्याचे एमडी प्रल्हाद लावंड यांना डांबून ठेवून दोन कोटी रुपयांची वसुली करून देण्यासाठी आमदार पाटीलसह दहाजणांनी लावंड यांना दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. पाटील यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला होता. सरकारतर्फे माधुरी म्हात्रे, आमदारांतर्फे महेश जेठमलानी, मिलिंद थोबडे, राजकुमार म्हात्रे, विनोद सूर्यवंशी, गौरांग काकडे, दत्ता गुंड, महादेव ऐवळे तर लावंडतर्फे अशोक मुंदर्गी या वकिलांनी काम पाहिले.