आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bal Nandagaonkar Comment On Left Party Members In Solapur

गेले ते उंदीर, राहिले ते वाघ - बाळा नांदगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष आहे. सोलापुरात निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असताना दोघा -तिघांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. गेले ते उंदीर, राहिले ते वाघ असे म्हणत मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर खरमरीत टीका केली. तसेच त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.

मनसेला गळती लागली आहे, या आरोपाचे नांदगावकर यांनी खंडन केले. मराठी अस्मितेसाठी मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. अनेक प्रश्नांवर आक्रमक आंदोलने करून मराठी माणसांची बाजू मांडली. परंतु सध्या चर्चेत असणारी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणि मनसेतून काही पदाधिकाऱ्यांचे जाणे यामुळे बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. निवडणुका आल्या की अशा गोष्टी होत असतात. पक्षाला काही फरक पडणार नाही, असे नांदगावकर यांनी सांगितले. मनसेने मराठी माणसांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. नाशिकमध्येही थोडी तडजोड झाली पण ती नाशिकचा विकास समोर ठेवूनच होती. सोलापुरातूनही दोघे-तिघे गेले. परंतु, यामुळे पक्ष संपला असे होणार नाही.
यांनी सोडली मनसे साथ
सोलापूरशहर वाहतूक सेना शहराध्यक्ष सुभान शेख, शहर उपाध्यक्ष आनंद मुसळे, माजी उपमहापौर आणि शहर उपाध्यक्ष आप्पाशा म्हेत्रे आदी.