आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या वाईट स्थितीला शिंदे व पवारच जबाबदार; बाळा नांदगावकरांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अंतर्गत वाद व राजकारण थांबवावे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्याला भरीव मदत देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकावा. सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने बारामतीला उजनी धरणातील पाणी पळवणे थांबवावे,’ अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधान सभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.

मनसेच्या मेळाव्यासाठी सोलापूर दौर्‍यावर आलेले नांदगावकर यांनी शुक्रवारी सकाळी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. र्शी. नांदगावकर यांनी सोलापूरच्या दुरवस्थेसाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जबाबदार धरत टीका केली. ते म्हणाले, सोलापूर व माढा या लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात दोन्ही मोठे नेते प्रतिनिधित्व करीत आहेत. तरीही सोलापूर जिल्ह्याची दुरवस्था आहे. देशाच्या गृहमंत्रिपदी असताना शिंदे जबाबदारीने बोलत नाहीत. ते ऊर्जामंत्री होते तेव्हाही सोलापुरात अंधारच आणि आताही आहे.

नांदगावकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातून हजारो कोटींचा कर केंद्राकडे जातो. मात्र, महाराष्ट्राला त्या प्रमाणात निधी दिला जात नाही. आम्ही कर भरतो पण सुविधा मात्र मिळत नाहीत. मराठवाड्याला पाणीटंचाई तीव्र आहे. वर्षांनुवष्रे याच समस्या असून दरवर्षी केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री फक्त बैठकाच घेतात. आजही शरद पवार अकलूजमध्ये बैठकच घेत आहेत. शिक्षणात महाराष्ट्र मागास राहिला आहे. मुख्यमंत्री सांगतात की, कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून सोलापूरला पाणी आणू. पण त्यासाठी इथे बसून काय होणार? तिथे गेले पाहिजे. तरच पाणी मिळेल. पवारांनी उजनी धरणातील पाणी बारामतीसाठी नेणे बंद केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी सोलापूरचे संपर्क प्रमुख प्रकाश दरेकर, जयप्रकाश बावीस्कर, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हाप्रमुख भूषण महिंद्रकर, शहराध्यक्ष प्रशांत इंगळे, युवराज चुंबळकर, सुधीर पवार, गिरीश काळे आदी उपस्थित होते.

शिवशरण पाटील भेटले
मनसेला राज्यात खूप चांगले वातावरण आहे. दुर्दैवाने आम्ही पोहोचण्यात कमी पडतो आहोत. सोलापूरकडे वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष आहे. इथले कार्यकर्ते एकलव्यासारखे पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. शिवसेनेला चिन्ह मिळण्यासाठी 22 वष्रे आणि पहिला आमदार निवडून आणण्यासाठी 16 वष्रे वाट पाहावी लागली. मनसेला चिन्ह लवकर मिळाले आणि पहिल्याच झटक्यात 13 आमदार व 175 नगरसेवक निवडून आले. अनेकजण मनसेमध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. रात्री माजी आमदार शिवशरण पाटील भेटून गेले. आता येथे राजाराम पवार भेटायला आल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले.

सदिच्छा भेट
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांची टीका, जाणता राजाने बारामतीला उजनीचे पाणी नेणे बंद करावे, सोलापूरची समस्या सुटू शकेल