आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सरचिटणीसपदी बालाजी पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा मेळावा नुकताच पंढरपूर येथे पार पडला. या वेळी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार (मुंबई), कार्याध्यक्ष -सुनील पाटणकर (वर्धा), सरचिटणीस -बालाजी पवार (नांदेड), कोशाध्यक्षपदी गोरख भिल्लारे (पंढरपूर) यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: व्यवस्थापन समिती सदस्य -गोपीनाथ चव्हाण (उरण), श्रीकृष्ण िशंदे (बुलडाणा), शिरीष जैन (धुळे) यांची केंद्रीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. विभागीय उपाध्यक्ष नरहरी आवटे (मुंबई), अण्णासाहेब जगताप (औरंगाबाद), दिनेश उके (गोंदिया), विकास सूर्यवंशी (सांगली), श्रीराम खत्री (यवतमाळ), गोपाल चौधरी (जळगाव), ज्ञानेश्वर धुमाळ (कसारा) तसेच विभागीय संघटन सचिवपदी संजय पावसे (मुंबई), शिवाजी वाकोडे (परभणी), रघुनाथ कांबळे (कोल्हापूर), विनोद पन्नासे (चंद्रपूर), मनोज खांबे (महाड), ललित अग्रवाल (अकोला), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), तर सल्लागारपदी अशोक डहाळे (जळगाव), शिवगोंडा खोत (इचलकरंजी) यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून भाऊ राणे, सदानंदूर (मुंबई), चेतन चौधरी (नांदेड), भीमराव वायभट (औरंगाबाद), प्रकाश गुंड (परभणी), किशन क्षीरसागर, जगदीश उमरदंड (लातूर) सुदाम चव्हाण, परमेश्वर खरात (बीड), जमीर शेख (आंजी), बिंदुसार रणवीर, राकेश आकरे (नागपूर), मेघराज टोणपे (चंद्रपूर), संजीव थोटे (तुमसर), िकशोर मोरे (भंडारा), संजीव दानोडे, आमगाव, पांडुरंग माळी, उमेश वाणी (नंदुरबार), विकास सूर्यवंशी (धुळे), रवी जोशी (जळगाव), प्रकाश उन्हाळी (शेगाव), आनंद धोडवड, राजेंद्र माळी (सातारा), संतोष शिरभाते (यवतमाळ), पांडुरंग हरमकर (अकोला), मारुती नवलाई (सांगली), विकास पवार (पंढरपूर), अण्णा गुंडे (रांगोळी) यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात पहिल्या सत्रामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी आमदार सुधाकर परिचारक, कल्याणराव काळे (चेअरमन), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...