आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray First Anniversary Programme At Solapur

बाळासाहेबांना चित्र-शिल्पांतून आदरांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- वेळ सायंकाळची, सूर्य मावळतीला चाललेला.. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे या नावाचा सूर्य आजही हजारो शिवसैनिकांच्या मनपटलावर तळपत आहे. त्यांच्या आठवणींनी सर्वजण गहिवरले होते. निमित्त होते बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमाचे.

चार हुतात्मा पुतळा परिसरात रविवारी सायंकाळी सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने चित्र-शिल्पांतून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक प्रसंग चित्र-शिल्पांतून मांडण्यात आले होते. युवा शिल्पकार देविदास मेटकरी यांनी बाळासाहेबांचे मातीचे शिल्प साकारून र्शद्धांजली वाहिली. चित्रकार दयानंद पटणे यांनी व्यंगचित्र काढून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राहुल माने यांनी व्यक्तीचित्र तर प्रवीण रणदिवे यांनी पेन्सिलच्या साहाय्याने बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र साकारले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सोलापूर शहर शिवसेनेचे विजय पुकाळे, भगवान परळीकर, दत्तात्रय गणेशकर, उज्ज्वल दीक्षित यांच्यासह काँग्रेसचे महेश कोठे, चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, बसपचे आनंद चंदनशिवे, रिपाइंचे राजा सरवदे, माजी नगरसेवक अमोल शिंदे आदी मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अनिता दुते यांनी सूत्रसंचालन केले.

बाळासाहेबांनी कायम मराठी अस्मिता जपली
महेश कोठे - बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. दुसर्‍या पक्षाचा असलो तरी मी कायम बाळासाहेबांचा आदर केला आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे नाव शहरातील एखाद्या सभागृहाला दिले जावे.

राजा सरवदे - बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचे मानबिंदू होते. त्यांच्या योगदानाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.