आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळे पुलाचे ग्रहण सुटणार तरी कधी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाळेयेथील अनुसूचित जातीच्या लोकांच्या स्मशानभूमीकरता देण्यात येणाऱ्या पर्यायी जागेचा तिढा सुटता सुटेना. जिल्हा प्रशासनाने आणि महापालिका प्रशासनाने घेतलेल्या दोन निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे आता नव्याने जागा शोधून सुचवा, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून आले आहेत. त्यानुसार महापालिका जागा शोधून तो प्रस्ताव लवकरच सादर करणार आहे. पूर्वीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि आता नव्याने सुचवण्यात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यानिर्णयाची झाली नाही अंमलबजावणी
राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बाळे येथे पुलाचे काम २०११ मध्ये सुरू करण्यात आले. पुलाच्या एका टोकाला अनुसूचित जातीच्या लोकांच्या स्मशानभूमीची जागा होती आणि ती जागा पुलाच्या बांधकामामध्ये जात होती. अनुसूचित जातीच्या लोकांनी पर्यायी जागा देण्याची मागणी केली. माजी जिल्‍हाधिकारी गोकुळ मवारे यांनी बाळे येथील लिंगायत स्मशानभूमीच्या २६ गुंठे जागेपैकी १३ गुंठे जागा अनुसूचित जातीला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यानंतर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बाळे येथील ओढ्यालगत मांगोबा मंदिराच्या उत्तरेला असलेली स्मशानभूमीसाठी आरक्षित जागा देण्याचा निर्णय घेतला. त्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरपर्यंतचा रस्ता तयार करावा लागेल. स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीसह त्यामध्ये सर्व सुविधांची पूर्तता करावी लागेल. हे काम खर्चिक आणि वेळ लागणारे असल्यामुळे एकंदरीत जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवू
नुकत्याचझालेल्या बैठकीत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्मशानभूमीसाठी १३ गुंठे जागा सुचवण्यास आम्हाला सांगितले. त्यानुसार बाळे येथील ओढ्याच्या लगतच आम्ही काही अडचणी नसलेल्या तीन जागा निवडल्या आहेत. त्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हा प्रशासनाकडे पाठवणार आहोत. यानंतर लवकरच प्रश्न मार्गी लागेल.” एम.एन. क्षीरसागर, प्रभारीसाहाय्यक संचालक, *का नगररचना

टॉवरचे काम मार्गी लागेल
विजेचेतीन टॉवर पूर्णपणे उभारण्यात आले आहेत. तिसरा टॉवर उभा करण्यासाठी दोन शेतकऱ्यांची अडचण होती. जिल्हा प्रशासनाने त्यावर सुनावणी करण्यासाठी तारीख दिली होती. परंतु ते त्यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांत विजेच्या टॉवरचे काम मार्गी लागेल. स्मशानभूमीचे काम मात्र लवकर मार्गी लागत नाही.” बी.बी. इखे, राष्ट्रीयमहामार्ग प्रकल्प संचालक
पुलाची उंची वाढल्यामुळे विजेच्या तारांचे अंतर वाढवण्यासाठी पर्यायी टॉवर उभारण्याचे काम सुरू.

उच्च दाबाच्या विजेच्या तारांचे काम मार्गी
बाळेपुलावरून विजेच्या उच्च दाबाच्या तारा गेल्या आहेत. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्याची उंची वाढणार आहे. उंची वाढल्यामुळे जमिनीपासून विजेच्या तारांचे अंतर कमी होणार. यामुळे या तारांची उंची वाढविणे गरजेचे होते. म्हणून याला पर्यायी चार टॉवर उभे करण्याचे ठरले. तीन टॉवर उभे करण्यासाठी काहीही अडचण आली नाही. परंतु एका टॉवरसाठी काही शेतकऱ्यांची अडचण होती. मात्र, त्याचाही तोडगा काढण्यात आल्यामुळे आता तीही अडचण राहिली नसून काही दिवसातच टॉवरचे काम मार्गी लागणार आहे.