आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनाट्यात रमली गंमत शिबिरातील मुले , पहिल्या दिवशी घेतले अभिनयाचे ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बालभवनच्यावतीने सुरू झालेल्या गंमत शिबिराच्या पहिल्या दिवशी मुले बालनाट्यात रमली. विवेकानंद केंद्राच्या पाठीमागील बाजूच्या हिरवळीवर १५ ते २० एप्रिल कालावधीत सकाळी आठ ते अकरा या वेळेत गंमत शिबिर होत आहे. बुधवारी सकाळी डाॅ. माधवी रायते यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन झाले. सोप्या भाषेत आशयसंपन्न गोष्टी सांगत त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला आणि हळुवार संस्कारांची पेरणी केली.

मुलांचे खेळून झाल्यानंतर बालनाट्याचा प्रयोग झाला. मीरा शेंडगे यांनी नाटकातील कलाकारांची वेशभूषा, रंगभूषा म्हणजे काय, ती कशी असते, त्याचा अभिनयासाठी काय उपयोग असतो हे समजावून सांगितले. एखादा प्रसंग घडल्यानंतर व्यक्त होण्याची पद्धत, आवाजात होणारा चढउतार, नम्र वाक्ये कशी बोलायची आदींचे मार्गदर्शन करण्यात आले.
मुलांनी हट्ट कसा करायचा, रडायचे कसे, हसायचे कसे याचेही अभिनय करून दाखवले. यावेळी नीला मोरे, मृणाल मोरे, अरुणा म्हैत्रस, संगीता सपरे, पूनम जेऊरे आदी उपस्थित होते.
बुधवारी गंमत शिबिराच्या पहिल्या दिवशी बालसवंगड्यांनी बालनाट्याचे धडे गिरवले.