आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- आठवड्यातून तीन दिवस धावणारी सोलापूर -यशवंतपूर (बंगळुरू) एक्स्प्रेस (क्रमांक 22133 व 22134) ही गाडी येत्या 25 सप्टेंबरपासून रोज धावणार आहे. या गाडीमुळे सोलापूरकरांची चांगली सोय होणार आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुशील गायकवाड यांनी दिली.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून सोलापूर-यशवंतपूर रोज धावेल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. सोलापूरहून ही गाडी आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी धावते. ती आता रोजच धावणार असल्याने सोलापूर आणि गुलबग्र्याच्या प्रवाशांची सोय होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या सेवेचा उद्घाटन होणार आहे. 25 सप्टेंबर रोजी गुलबर्गा स्थानकावर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सोलापूर विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित असतील.
बंगळुरूसाठी चांगला पर्याय
अनेक जण बंगळुरूला जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेस निवडतात. त्यामुळे उद्यानला मोठी गर्दी असते. आता थेट यशवंतपूरसाठी रोज गाडी धावणार असल्याने सोलापूरकरांना बंगळुरूला जाण्यासाठी चांगला पर्याय मिळाला आहे. शिवाय उद्यान एक्स्प्रेसच्या आधी ही गाडी पाहेचते. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.