आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौभाग्यवतींच्या पूजेसाठी श्रीमानांनी घेतला पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडांभोवती फेर्‍या मारणार्‍या सौभाग्यवतींना त्यांच्या पतीराजांनी गुरुवारी सकाळी वडाची रोपे विकत आणून देऊन मदत केली. झाडांच्या फांद्या तोडून पूजा करण्याऐवजी हा स्तुत्य उपक्रम शहर व जिल्ह्यातील अनेक सूज्ञ दांपत्यांकडून राबवण्यात आला.
वाढत्या शहरीकरणामुळे वडाच्या झाडांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सर्रास झाडाच्या फांद्या तोडून आणल्या जातात. मनोभावे पूजा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या फांद्या कचर्‍यात पडल्याचे आढळतात. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला. शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सवलतीच्या दरात वडाची रोपे विक्रीसाठी ठेवली. बाजारात पाच ते दहा रुपये देऊन झाडाच्या तोडलेल्या फांद्या खरेदी करण्याऐवजी अनेकांनी थेट रोपे विकत घेऊन घरी आणले. पूजेनंतर ती रोपे घर, सोसायटी किंवा शेतशिवारात लावल्यास त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी मोलाच्या मदत होणार आहे.

जिल्ह्यात 600 रोपांची खरेदी
गुरुवारी विजापूर रस्त्यावरील संत जनाबाई भाजी मंडईच्या परिसरात सामाजिक वनीकरण विभागाने रोपे विक्रीचा स्टॉल उभारला होता. त्यास जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शहर आणि जिल्ह्यात मिळून सुमारे सहाशे रोपांची खरेदी झाली.