आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता संपल पालावरचं जिणं... वंचितांना मिळाला नागरिकत्वाचा हक्क!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- पिढ्यानपिढ्या समाजातील मुख्य प्रवाहापासून वंचित उपेक्षित राहून पालावरचं जिणं जगणा-या बंजारा गोसावी समाजातील अबालवृध्दांची बुधवारी शासनदरबारी नोंद झाली आणि ते भारताचे नागरिक झाले. सध्या झारखंडमधील खुंटी येथे कार्यरत आयएएस अधिकारी रमेश घोलप नायब तहसीलदार उत्तम पवार यांच्या हस्ते २६ कुटुंबांना शिधापत्रिका रहिवासी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
अर्ज, विनंत्या करूनही प्रशासन दाद देत नसल्याच्या तक्रारी असतात. परंतु, या कुटुंबांची व्यथा लक्षात आणून दिल्यानंतर लागलीच प्रशासन हलले आिण विशेष म्हणजे त्यांना तहसील कार्यालयात बोलवता अधिकारी स्वत: पालावर गेले.
आयएएस अधिकारी घोलप म्हणाले, ‘केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची ती सक्षमपणे राबविण्याची प्रशासनाची जबाबदारी असते. "प्रशासन आपल्या दारी' या अभिनव उपक्रमातून खुंटी येथे गोरगरिबांसाठी विविध दाखले, आधारकार्ड, पेन्शन योजना असे अनेक कार्यक्रम मोबाइल वाहनाच्या माध्यमातून गावपातळीवर राबविले. यातूनच अवघ्या चार दिवसांत २८१८ लोकांना इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेत सामील करून घेतले. तसेच भटक्या समाजातील मुलांच्या आयुष्याची ससेहोलपट थांबवली पाहिजे. या लहानग्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी त्यांना शिक्षणाची दारे खुली करावीत.’
नायब तहसीलदार पवार म्हणाले, ‘वर्षानुवर्षे उपेक्षित भटक्या समाजातील कुटुंबांनी प्रशासनाशी संवाद साधून आपले हक्क मिळवावेत.’ यावेळी नगराध्यक्ष रमेश पाटील, अजित कुंकूलोळ, महेश निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश फुरडे, नंदकुमार होनराव, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, विनोद बुडूख, बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी अशोक कावडे, रमेश कासवटे, शंकर गव्हाणे, कृष्णा उपळकर, प्रवीण शिंदे, वैशाली जाधव, विनया जाधव, अश्विनी शिंदे उपस्थित होते.
वंचितांना प्रथम केशरी रेशनकार्ड दिले. बीपीएल रेशनकार्डचा कोटा ठरलेला असतो. टप्प्याटप्प्याने शासकीय नियमानुसार इष्टांक आदींच्या अहवालानंतर त्यांना बीपीएल रेशनकार्ड देऊ.”
उत्तमपवार, नायबतहसीलदार, बार्शी
पिन, टिकली विकून कुटुंब चालवतो. रेशनकार्ड रहिवासी प्रमाणपत्र नसल्याने आमची ओळखही पुसली गेली होती. शासकीय योजनांचा लाभ िमळत नव्हता. आता केशरी रेशनकार्ड मिळाल्याने आनंद झाला आहे. परंतु पिवळे रेशनकार्ड मिळावे.” सदाशिवमुळेकर, वंचितलाभार्थी, बार्शी