आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सबबी नको, वसुलीचे सांगा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बँका विसर्जनात निघून दहा-बारा वर्षे झाली. कर्जदारांकडील रकमांची वसुली करणार कोण? ठेवीदारांचे पैसे परत करणार कोण? अशी विचारणा जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी बँकांच्या अवसायकांना (लिक्विडेटर) केली. यापुढे कुठल्याही सबबी चालणार नाहीत, अशी सक्त सूचनाही त्यांनी केली.

शहर, जिल्ह्यातील अवसायकांची त्यांनी बैठक घेतली. सोलापूर नागरी औद्योगिक बँक, इंदिरा र्शमिक महिला बँक, अक्कलकोटची स्वामी सर्मथ बँक, र्मचंट को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर जिल्हा महिला बँक, भारत अर्बन बँक आणि अर्जुन बँकांचे अवसायक उपस्थित होते. वसुलीसंदर्भात सर्वांनीच अडचणी सांगितल्या. विमापात्र ठेवरकमांच्या दाव्यांची माहिती दिली. काम समाधानकारक नसल्याचा शेरा मारून श्री. लावंड यांनी, वसुलीवर भर देण्यास सांगितले.

मुदतवाढ द्यायची कशी?
97 व्या घटनादुरुस्तीनुसार सहकार कायद्यात ज्या सुधारणा झाल्या, त्यात अवसायन प्रक्रियेला र्मयादा घालण्यात आली. परंतु, सोलापुरातील बँका बंद पडून दहा-बारा वर्षे झाली तरी अजून मुदतवाढ मागण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीतच आवश्यक ती कारवाई होत नाही. मुदतवाढ देऊन काय साध्य होणार आहे, हे अनाकलनीय असल्याचा शेराही श्री. लावंड यांनी मारला.

जप्ती का नाही?
कर्जदार रक्कम भरण्यास तयार नसतील तर त्यांच्या मालमत्तेची जप्ती का करत नाही? असेही श्री. लावंड यांनी विचारले. जप्तीसाठी आवश्यक 98 चा दाखला देण्यास मी तयार आहे. असा कुठलाच प्रस्ताव येत नाही. याचा अर्थ काय समजायचा? त्यांना मोकाट सोडायचे का? पुढच्या बैठकीत एकूण वसुली, मालमत्तेची जप्ती, त्याचा लिलाव व ठेवीदारांच्या रकमांचे वितरण याच गोष्टी सांगा, असे ते म्हणाले.