आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेला भगदाड पाडून सव्वाचार लाख लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कव्हे (ता. माढा) येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या इमारतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेसंदर्भात बँकेचे शाखाधिकारी दत्तात्रय भीमराव राऊत (वय 30, रा. कुडरुवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे : शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शाखाधिकारी राऊत यांनी नेहमीप्रमाणे बँक बंद करून घरी गेले. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला त्यांना गावातील काही लोकांनी बॅंक फोडल्याची फोनवरून माहिती दिली. प्रारंभी अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती न तुटल्याने चोरट्यांनी सरळ भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेची आणि अलार्म सिस्टिमची वायर धारदार हत्याराने तोडली. नंतर तिजोरी बसविलेल्या खोलीत प्रवेश करून तिजोरीचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यातील 4 लाख 26 हजार 440 रुपये रोख रक्कम पळवून नेली. हा धाडसी प्रकार शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान घडला असावा, अशी माहिती कुडरुवाडी पोलिसांनी दिली.