आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Banking Expert Vidyadhar Anaskara Lecture At Laxmi Bank's 86th Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नफ्याला हात लावता अनुत्पादक कर्जांची तरतूद करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नफ्याला हात लावता अनुत्पादक कर्जांची (एनपीए) तरतूद करा. त्यासाठी बँकेतील स्वनिधीचा वापर करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलेले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची भीती बाळगू नका. अनेक खासगी बँका भागभांडवल वाढवून ‘एनपीए’ची तरतूद करत आहेत. सहकारी बँकांनी त्या पद्धतीने काम करण्यास हरकत नाही, असा सल्ला बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर (पुणे) शनिवारी यांनी येथे दिला.
लक्ष्मी सहकारी बँकेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. ‘सहकारी बँकांसमोरील आव्हाने’ हा व्याख्यानाचा विषय होता. आमदार सुभाष देशमुख अध्यक्षस्थानी होते. बँकेचे अध्यक्ष अॅड. भास्कर नेर्लेकर, उपाध्यक्ष डॉ. श्रृती वडगबाळकर, ज्येष्ठ संचालक डॉ. पुरणचंद्र पुंजाल, सरव्यवस्थापक बसवराज बोडा आदी मंचावर होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री. अनास्कर पुढे म्हणाले, “खरे तर कर्जदार हा बँकेचा अन्नदाता असतो. परंतु त्याला वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. त्याच्यावर ‘एनपीए’चा शिक्का बसला, की सगळेच त्याला नाकारतात. त्याला कर्ज देतानाच त्याच्या तारणाकडे पाहिले जाते. त्याच्या उत्पन्नातूनच कर्जाची परतफेड कशी करून घ्यायची, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असते. परंतु तसे हाेत नाही. तारणी मालमत्ता जप्त करणे, त्याचा लिलाव करणे हे काम बँकेच्या वसुलीच्या प्राधान्यक्रमांत शेवटचे आहे. परंतु बहुतांश वसुली अधिकारी याच कामासाठी जास्त लक्ष देतात. त्यामुळे दोघांचेही नुकसान होत असते.”
‘एमपीआयडी’ने सारेच जाणार
- संचालकांना नफ्याचा वाटा द्यावा, यासाठी मी आग्रही आहे. परंतु त्याची दखल जात नाही. उलट संचालकांना कोंडीत पकडण्याचे नियम केले जाते. आता तर ‘महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा’ (एमपीआयडी) आला. त्याने स्वमालकीची, वडिलोपार्जित सगळी मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आहेत.
विद्याधर अनास्कर, बँकिंग तज्ज्ञ
संचालकांना नफ्याचा वाटा द्या
- संचालकांनी कर्जे घ्यायची नाहीत, कुणाला जामीनदार व्हायचे नाही, हे रिझर्व्ह बँकेचे िनयम आहेत. त्यास अधीन राहून बँक चालवायची असते. तेवढे केल्यानंतर जो नफा होतो, तोही सभासदांना वाटायचा असतो. त्यात संचालकांचा वाटा नसतो. तो देण्याविषयी अनास्करांनी शासनाकडे मागणी करावी.
सुभाष देशमुख, आमदार