आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banking Transactions Latest News In Divya Marathi

सावधान, बँकिंग व्यवहार निवडणूक आयोग पाहतोय, आयआरएस दर्जाचे निरीक्षक करणार तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- निवडणूकआचारसंहितेमुळे बँकिंग व्यवहारांवर यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. कुणाच्या खात्यावर १० लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली अथवा ठेवली जात असल्यास त्याची माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी लागेल. याच पद्धतीने उमेदवाराच्या खात्याकडे पाहताना एक लाखाची मर्यादा ठेवण्यात आली. त्याच्या खात्यावर लाखाची रक्कम ठेवली किंवा काढली तरी त्याचा तपशील तपासण्यात येणार आहे. त्यासाठी आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून मंगळवारी सोलापूरला येत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर, उत्तर दक्षिण सोलापूर आणि शहराच्या काही ठिकाणी पैसे सापडण्याचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा विधानसभा निवडणुकीत आर्थिक व्यवहारांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली. त्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना अधिका-यांवर देण्यात आल्या. इंडियन बँक्स असोसिएशनला त्याचे लेखी पत्रही देण्यात आले. त्यामुळे बँकिंग व्यवहार करताना ग्राहकांनी सावधता बाळगावी. पुरेसा तपशील जवळ ठेवावेत. अन्यथा चौकश्यांना सामोरे जाण्याची वेळ येईल.
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडतो. ‘राजकीय’ खबऱ्यांमुळे हा पैसा ठेवायचा कुठे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे बहुतांश पैसा बँकेत येतो आणि जातोही. कार्यकर्त्यांच्या खात्यावरूनही पैशाचे व्यवहार होत असतात. त्यामुळे सरसकट दहा लाखांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची सूचना आयोगाने केली. बँकांशिवाय कुठे पैसे सापडल्यास आयकर अधिका-यांमार्फत चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.