आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bansode Hospitality Issue At Solapur, Divya Marathi

बनसोडेंचा सत्कार पावसामुळे गुंडाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्षाच्या वतीने नूतन खासदार अँड. शरद बनसोडे यांचा भव्य सत्कार गुरुवारी आयोजिला होता. कार्यकर्त्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेत त्यासाठी नॉर्थकोट प्रशालेचे मैदान सजवण्यात आले होते. मात्र, निम्म्या खुच्र्या रिकाम्या होत्या. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रम गुंडाळावा लागला. अँड. बनसोडे यांना भाषण करण्याचीही संधी मिळाली नाही.

सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धुव्वा उडवत अँड. बनसोडे विक्रमी दीड लाख मताधिक्याने निवडून आले. या पार्श्वभूमीवर अँड. बनसोडे यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी चांगलीच गर्दी पक्षाने गृहीत धरली होती. सायंकाळी साडेसहाचा कार्यक्रम एक तास उशिरा साडेसातला कार्यकर्त्यांच्या र्मयादित उपस्थितीत सुरू झाला. अध्र्या तासानंतर पावसाला सुरुवात झाली आणि भाषणे थांबवून कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. जोरदार वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्याने मंचावरील पडदे फाटले, खुच्र्याचा आर्शय घेत कार्यकर्ते पांगले. पाऊस सुरू झाल्याने आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाषण निम्म्यातच संपवले.
बनसोडेंचे भाषण झालेच नाही

अँड. बनसोडे, त्यांच्या पत्नी वर्षा यांचा सत्कार भाजपचे प्रदेश नेते रघुनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारानंतर बनसोडे नतमस्तक झाले. बनसोडे काय बोलतील याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून होते. पावसामुळे त्यांचे भाषण होऊ शकले नाही. श्री. कुलकर्णी यांचेही भाषण झाले नाही.
खुच्र्या रिकाम्या
सुमारे दोन हजार नागरिक कार्यक्रमास येतील असे नियोजन होते. पण निम्म्याच भरल्या होत्या. पाऊस आल्यानंतर त्याही रिकाम्या झाल्या.पक्षाच्या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील यांची अनुपस्थिती होती.
कार्यकर्त्यांना दिले श्रेय
आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक करताना विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले. या वेळी शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशध्यक्ष तानाजी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची भाषणे झाली. रिपाइं (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

शहर भाजपतर्फे नूतन खासदार शरद बनसोडे त्यांच्या पत्नी वर्षा यांचा सत्कार करताना (डावीकडून) नगरसेवक संजय कोळी, अमर पुदाले, चंद्रकांत रमणशेट्टी, आमदार सिद्रामप्पा पाटील, विजयकुमार देशमुख, पक्षाचे नेते रघुनाथ कुलकर्णी, राजा सरवदे, शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण.