आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार संघटनेच्या निवडणुकीत घोडकेंचे पॅनल पुन्हा विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकारी निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अँड. शिवशंकर घोडके यांच्याच पॅनेलचे वर्चस्व दिसून आले. एक जागा वगळता बाकी जागांवर घोडके पॅनलने पुन्हा बाजी मारली. यंदा इ-मेल, मेसेजेस् आणि प्रत्यक्ष गाठीभेटींवर उमेदवार वकील व त्यांच्या सर्मथकांचा भर होता. अध्यक्षांसह इतर पदाधिकार्‍यांची निवड निवडणुकीद्वारे झाली.

अँड. घोडके आणि माजी उपाध्यक्ष एच. एम. अंकलगी यांच्या पॅनलमध्ये कमालीची चुरस दिसून आली. सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया झाली. 850 मतदारांनी सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान केले. 90 टक्के मतदान झाले. यंदाची निवडणूक विधिज्ञ आणि विधीविकास या दोन पॅनलमध्ये होती. विद्यमान अध्यक्ष घोडके दुसर्‍यांदा निवडणूक रिंगणात होते. जिल्हा बारचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर होणार असला तरी लगबग सकाळपासूनच सुरू होती. पाचनंतर मतमोजणीचे काम सुरू झाले. पहिल्यापासून घोडकेंच्या पॅनलने सरशी घेत एकहाती बाजी मारली.

विधी विकास पॅनलकडून अध्यक्षपदासाठी - घोडके, उपाध्यक्ष- संतोष न्हावकर, सचिव- महेश जगताप, खजिनदार- अमित आळंगे, सहसचिव- वैशाली बनसोडे तर विधिज्ञ पॅनलकडून अध्यक्षपदासाठी अंकलगी, उपाध्यक्ष- रफीक शेख, खजिनदार- संजय चव्हाण, सहसचिव- स्वाती बिराजदार, सचिव- रेवणसिद्ध कोनापुरे रिंगणात होते. उपाध्यक्षपदासाठी श्रीनिवास कटकूर, अजय यल्ला तर सहसचिव पदासाठी वीरेश धरणे हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. अँड. प्रदीपसिंह रजपूत, अँड. पी. बी. लोंढे-पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मतमोजणीपश्चात विजयी उमेदवारांनी एकमेकांना गुलाल लावत जल्लोष साजरा केला.


पराभूत पॅनलमधून एकच
विधिज्ञ विकास पॅनलमधून केवळ अँड. स्वाती बिराजदार या निवडून आल्या. प्रतिस्पर्धी अँड. वैशाली बनसोडे यांच्यापेक्षा त्यांना 13 मते जास्त पडली. सहसचिव पदासाठीच्या या निवडीत बनसोडे यांना 253 तर बिराजदार यांना 266 मते पडली. तर अपक्ष उमेदवार धरणे यांना 217 मते पडली.