आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट्स अॅपवर ‘हाय हॅलो’ पण सिग्नलचा व्यत्यय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘व्हॉट्सअॅप’ने मोफत फोन कॉल करण्याची मुभा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होईल, असे सध्या दिसून येत नाही. मात्र, भविष्यात इंटरनेटच्या सिग्नलचा व्यत्यय कमी झाल्यास मोफत फोन कॉल करणे शक्य होईल, असे मत सोलापुरातील तरुणाईने व्यक्त केले.

‘व्हॉट्स अॅप’च्या सुधारित आवृत्तीद्वारे मोफत फोन करता येतो. मात्र, व्हॉइस कॉलच्या वेळेनुसार दोन्ही मोबाइलमधील इंटरनेट डाटा वापरला जाणार आहे, याचेही गणित केले पाहिजे. शिवाय, सध्या या कॉलवरून संवाद साधण्यास खूप उशीर होतो, असे मत व्यंकटेश इरकशेट्टी यांनी व्यक्त केले.

गजानन कुलकर्णी म्हणाला, जी आणि जी सेवेतील फरकामुळे कॉल करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सध्या त्याचा वापर करणे सुरू नाही.

इंटरनेटचा मोठा अडथळा...
मुळातइंटरनेट कनेक्शन स्लो असेल किंवा नसेल तर कॉल लागत नाही. हा सर्वात मोठा अडथळा या सेवेसाठी असेल. इंटरनेट प्रोव्हाइड करणा-या कंपन्यांच्या सुरळीत सेवेनंतर ही सेवा प्रचलित होऊ शकते. याच धर्तीवरील विविध अॅपच्या माेफत व्हिडिओ कॉल सेवाही असल्या तरी विविध अडथळ्यांमुळे या सेवा तेवढ्या लोकप्रिय होऊ शकलेल्या नाहीत. विदेशातही मोफत काॅल करण्याची मुभा हे अॅप देत असले तरी याच्या उपयुक्ततेबाबत आणखी काही काळ जाऊ देणे आवश्यक ठरेल.