आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barshi Girl Played With Sania Mirza In Fed Trophy

दिव्य मराठी विशेष : सानियासोबत बार्शीच्या प्रार्थनाने गाजवला सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जागतिक क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर सानियासोबत पहिल्यांदा कोर्टवर खेळण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या युवा खेळाडूने पटकावला. यासाठी आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती प्रार्थना ठोंबरे भाग्यशाली खेळाडू ठरली.
तिने शनिवारी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सानियासोबत दुहेरीचा सामना जिंकला. फेड चषक टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या सामन्यात सानिया-प्रार्थनाने विजय संपादन केला. गत आठवड्यात फॅमिली सर्कल टेनिस स्पर्धा जिंकून सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत दुहेरीचे अव्वल स्थान गाठले.

नंबरवनच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर सानियाने आपल्या सत्रातील मोहिमेला सुरुवात केली. या वेळी तिने प्रार्थनासोबत आपल्या विजयाची मोहीम फत्ते केली. याशिवाय तिने सलग विजयाची लयदेखील कायम ठेवली. सानियाने शनिवारी आशिया-ओशियाना ग्रुप-२ च्या फेड चषकात प्रार्थनासोबत दुहेरीचा सामना जिंकला. नंबर वन झाल्यानंतरचा सानियाचा हा पहिला विजय ठरला.
सुवर्ण संधीची चमक

सानियासोबत खेळावे, असे बार्शीची युवा खेळाडू प्रार्थना ठोंबरेचे स्वप्न होते. प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने ही स्वप्नपूर्ती केली. तिला तिसऱ्यांदा सानियासोबत खेळण्याची संधी मिळाली. आशियाई स्पर्धेत तिने सानियासोबत महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले. याशिवाय तिने आता जगातील नंबर वन झालेल्या सानियासोबत पहिल्यांदा खेळण्याचा बहुमानही पटकावला. यासाठी केलेल्या मेहनतीचे तिला फळ मिळाले.

योग्य समन्वयाने विजय

फेड चषकात आम्ही एकेरीचा सामना गमावला. त्यामुळे दुहेरीच्या निर्णायक सामन्यात आम्हाला विजयाची गरज होती. या वेळी सानियासोबत मी योग्य प्रकारे समन्वय ठेवला आणि सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. यासह भारताला फिलिपाइन्सविरुद्ध विजय मिळवून दिला. -प्रार्थना ठोंबरे, युवा टेनिसपटू