आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- बसवेश्वरांनी समाजात स्पृश्य -अस्पृश, स्त्री -पुरुष समानता आणि जाती-धर्माच्या पलीकडे जावून कार्य केले आहे. अशा प्रकारचे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची क्रांती त्यांनी 12 व्या शतकातच केली होती. असे प्रतिपादन हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टवेरू महास्वामीजी यांनी केले. बसव सेंटरच्या वतीने लिंगशेट्टी मंगल कार्यालयात मानद पदवीदान आणि सत्कार सभारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू इरेश स्वामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे उपस्थित होते.
महास्वामी पुढे म्हणाले की, बसवेश्वरांनी आपल्या कार्यात सर्व समाजाला समानतेची वागणूक दिली. त्यांनी धर्मामध्ये कोणताही भेदभाव केला नाही. त्यांचे कार्य सर्वानी एकत्र येऊन पुढे नेण्याची गरज आहे. तसेच समाजात ज्यांचे काम चांगले आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक असते. त्यामुळे बसव सेंटर अशा प्रकारचा चांगला उपक्रम राबवत आहेत. बसवेश्वरांचे कन्नडमधील साहित्य मराठीत भाषांतर करण्याचे कार्य तर खूपच चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढणार आहे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.