आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूर्ती प्रतिष्ठापना; बसवमूर्तीची मिरवणूक, 300 सुवासिनींचा सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- श्री बसवेश्वर भक्त मंडळाच्या महात्मा बसवेश्वरांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेची मिरवणूक सोमवारी दुपारी 12 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात निघाली. भवानीपेठ बसवनगर येथे बुधवारी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
प्रारंभी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याहस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. डॉ. श्री. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, श्री. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, श्री. रेणूक शिवाचार्य महास्वामीजी, श्री. बसवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, श्री. स्वामीनाथ शिवाचार्य महास्वामीजी, श्री. बसवराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात आणि आमदार विजयकुमार देशमुख, अध्यक्ष दयानंद विजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी बैलजोड, बैलगाड्या व नऊवारी साड्या नेसून सजूनधजून आलेल्या मंगल कलश घेतलेल्या सुवासिनी होत्या.