आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Basic Salary For Workers Rseni On The Road Point Removal Boycott Elections

मूळ वेतन र्शेणीसाठी सेविका रस्त्यावर-निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-अंगणवाडी कर्मचार्‍यांना मूळ वेतनर्शेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सुशीला कुलकर्णी प्रणीत सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. वेतनर्शेणी लागू न केल्यास येत्या निवडणुकीवर कर्मचारी व त्याचे नातेवाईक बहिष्कार टाकणार असल्याचे संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पार्वती स्वामी यांनी सांगितले.

स्वामी म्हणाल्या, ‘‘अंगणवाडी कर्मचार्‍यांना पुढे करून सूर्यमणी गायकवाड यांनी मानधन वाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्या मागणीला आमचा विरोध आहे. मानधन वाढीमुळे कर्मचार्‍यांचे प्रश्न मिटणार नाही. सध्याच्या महागाईच्या काळात महिला कर्मचार्‍यांना मूळ वेतनर्शेणी लागू झाली तरच खरा न्याय मिळणार आहे. त्यामुळे मानधन नको वेतनर्शेणी लागू झाली पाहिजे. गेल्या 37 वर्षांमध्ये फक्त नऊ वेळा मानधन वाढ झालीय.

पाच वर्षांनंतर सेविकांना फक्त 31 रुपये मानधन वाढ मिळते, ती वाढ अत्यंत तुटपुंजी असून कर्मचार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रकार शासनाकडून होतोय. त्यानंतरही मानधन वाढीची मागणी करणे महिलांची दिशाभूल करण्यासारखे आहे. गायकवाड हे सेविका व पर्यवेक्षिकांची एकत्रित संघटना चालवतात. पर्यवेक्षिकांच्या मदतीने काही तालुक्यांमध्ये सेविकांवर दबाब टाकत असून शासन व लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार संघटनेचे कामकाज करतात.’’

सुशीला कुलकर्णी यांनीच पहिल्यांदा राज्यात संघटना सुरू केली होती. त्यात गायकवाड कार्यरत होते. पण, नंतर त्यांनी स्वत:ची वेगळी संघटना सुरू केली. आठ जानेवारीला मुंबईत झालेल्या आंदोलनात कुलकर्णी प्रणीत संघटनेच्या महिलांचा सक्रिय सहभाग होता, असेही त्यांनी सांगितले. वेतनर्शेणी लागू झाल्याशिवाय धरणे आंदोलन मागे घेणार नाही. संघटनेचे जिल्ह्यात 1700 सदस्य असून संपूर्ण राज्यात अडीच लाख सभासद आहेत. शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या निवडणुकांवर कर्मचारी व त्यांचे सर्व नातेवाईक बहिष्कार टाकणार असल्याचे, स्वामी यांनी सांगितले.