आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! प्राणी संग्रहालयातून बाहेर पडल्याहेत मगरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील मगरींची पिल्लं पिंजर्‍यतून बाहेर पडली आहेत. दहा पैकी फक्त सातच मगरी सध्या पिंजर्‍यता आहेत. बुधवारी दुपारी नाल्यामध्ये मगरीचे पिल्लू आढळले. तेव्हापासून त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पिंजरा लावला. पण, त्यामध्ये ते न आल्याने चिंता वाढली आहे. या प्रकरणावर महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी कानावर हात ठेवले आहेत. प्राणी संग्रहालयातील मगरी बाहेर गेल्या नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मगरी लहान असल्याने त्यांच्यापासून मोठा धोका नाही. दरम्यान, प्राणी संग्रहालयात दोन मगरी आणि तिची 8 पिल्ले असल्याचे छायाचित्र ‘दिव्य मराठी’ कडे उपलब्ध आहे. सध्या संग्रहालयात दोन मगरी आणि 5 पिल्ले असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास लांडगे यांनी सांगितले. त्यामुळे उर्वरित मगरी कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय.

प्राणी संग्रहालयातील या मगरींचे फोटो 26 ऑक्टोबर 2012 रोजी काढलेले.