आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Beaten Up News In Marathi, Two Group Beaten Each Other, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रीनगर परिसरात हाणामारी, दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जुगार खेळण्यावरून शास्त्रीनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक व हाणामारी झाली. दोन्ही गटांतील 15 जणांसह एक पोलिस हवालदार जखमी झाले. रात्री उशिरा सदर बझार पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ताश्कंद चौक येथे रस्त्यावर काहीजण जुगार खेळत होते. तेथेच राहणारे श्रीकांत कोळेकर व रवी कोळेकर यांनी ‘येथे जुगार का खेळता?’ असे विचारले. यावरून दगडफेकीस सुरुवात झाली. यात नितीन कोळेकर (वय 32), नितीन काळे (वय 17), कृष्णा काटमे (वय 17), आनंद गायकवाड (वय 32), मालन माने (वय 40), नागनाथ सोनवणे (वय 45), धोंडिबा मस्के (वय 65), दत्ता मस्के (वय 50), सलमान शेख (वय 18), शब्बीर मौला शेख (वय 47), रेहाना रझाक शेख (वय 62), दौला रझाक शेख (वय 62), चाँद शब्बीर शेख (वय 47), मुदस्सर वहाब शेख (वय 24), मोबीन महिबूब शेख (वय 35) हे नागरिक आणि पोलिस मुख्यालयातील दंगाविरोधी पथकातील हवालदार रोहित रामचंद्र राजगुरू (वय 24) जखमी झाले आहेत.

सिव्हिलमध्ये नेत्यांची झाली होती गर्दी
या घटनेचे वृत्त कळताच नगरसेवक आनंद चंदनशिवे, इब्राहिम कुरेशी, अँड. संजीव सदाफुले, करण म्हेत्रे व परिसरातील नेतेमंडळींनी सिव्हिलमध्ये गर्दी केली. आपसात मिटवण्याच्या प्रयत्नात सर्वजण लागले. जखमींच्या नातेवाइकांमध्ये बाचाबाची होऊ लागल्याने मोठा बंदोबस्त होता.

घटना घडताच पोलिसांचा ताफा परिसरात दाखल झाल्याने तणाव थांबला आणि जखमींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालय, अश्विनी हॉस्पिटल आणि सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.