आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Beating Case MLA Mane Should Be Punishe, If Not To Ready Agitation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मारहाणप्रकरणी आमदार मानेंना अँट्रॉसिटी न लावल्यास आंदोलन करू'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नवी पेठेतील व्यापारी मग्रुमखाने यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार दिलीप माने यांच्यावर अँट्रॉसिटी गुन्हा नोंदवावा, अन्यथा चर्मकार समाजातर्फे राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार बबनराव घोलप यांनी दिला.

आज सोलापुरात आल्यानंतर घोलप यांनी नवी पेठेतील घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मग्रुमखाने कुटुंबांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दुपारी पत्रकार संघात पत्रकारांना भेटून चर्मकार समाजाची भूमिका त्यांनी मांडली. आमदार दिलीप माने यांच्या राजकीय दबावात येऊन या घटनेत पोलिसांनी आवश्यक त्या कलमांचा समावेश तक्रारीमध्ये केला नसल्याचा आरोप केला आहे. पोलिस अधिकार्‍यांचीही या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. या वेळी घोलप यांच्यासोबत अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे आदी उपस्थित होते.

अटक न करताच दिला जामीन
या घटनेत राजकीय दबाव आणून मग्रुमखाने कुटुंबावर अन्याय केला जात आहे. मग्रुमखाने मारहाणप्रकरणी आरोपींना अटक न करताच जामीन दिला.त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनीही व्यवस्थित हाताळले नाही. या प्रकरणी अँट्रॉसिटी न लावल्यास राज्यभर आंदोनल करावे लागेल.