आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात बिअर शॉपींवर कारवाईसाठी पथके तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गैरप्रकार करणार्‍या बिअर शॉपींवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक व कर्मचार्‍यांची पथके बुधवारी तैनात करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. एन. पवार यांनी दिली. दिवसाऐवजी रात्री कारवाईस वाव आहे. कारवाईची माहिती गुरुवारी प्रसारमाध्यमांना दिली जाईल, असेही ते म्हणाले. शहरातील अनेक बिअर शॉपींमध्ये गैरप्रकार सुरू असून फक्त बिअर विक्रीचा परवाना असतानाही इतर मद्य विक्री होत आहे, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने बुधवारी प्रसिद्ध केले होते.

विजापूर रोडलगत मंत्रीचंडक नगर येथील व्यापारी संकुलातील बिअर शॉपीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्रास होत असल्याची तक्रार तेथील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती. परंतु नंतर सोसायटीच्या सचिवाने तक्रार नसल्याचाही जबाब लिहून दिला. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्वच तक्रारदारांचे जबाब घेण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते.